तेरणा अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांच्या प्रक्षिक्षण कार्याचा सिस्कोकडून सन्मान
तेरणा अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांच्या प्रक्षिक्षण कार्याचा सिस्कोकडून सन्मान
धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) - येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयमध्ये २०१८-१९ पासून सिस्को या जगप्रसिद्ध कंपनीचे सिस्को नेटवर्किंग ट्रेनिंग सेंटर सुरु आहे. या ५ वर्षात हजारो विद्यार्थ्यांनी प्रोग्रामिंग, नेटवर्किंग व सायबर सेक्युरिटी अशा विविध क्षेत्रातील कोर्से पूर्ण केले आहेत. तेरणा अभियांत्रिकीचे प्रा. अनिरुद्ध देशपांडे हे कोर्से कोओर्डीनेटर व कोर्से इंस्ट्रक्टर म्हणून काम पाहतात तर प्रा.कृष्णकांत मुळे हे कोर्से इंस्ट्रक्टर म्हणून कार्यरत आहेत. दोघांच्याही मार्गदर्शनखाली हजारो विद्यार्थ्यांनी सिस्को राऊंटिंग ऍण्ड स्विचिंग अशा सीसीएनए कोर्से शृखंलातील प्रमुख कोर्से व इतर कोर्सेस पूर्ण केले आहेत. प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांना २०१८-२०२३ या ५ वर्षाच्या डेडिकेटेड सर्विस आणि ऍक्टिव्ह पार्टसिपेशन अवॉर्डने तर वर्ष २२-२३ साठी कृष्णकांत मुळे यांना एक्स्पर्ट लेवल इंस्ट्रक्टर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांना कॅम्पस मुलाखत यशस्विरित्या पूर्ण करण्यासाठी या कोर्सेसचा उपयोग झाला आहे. इंटर्नशिप, कॅम्पस प्लेसमेंट, ट्रैनिंग अशा विविध विभागात अशा कोर्ससचा उपयोग होत आहे. तर आयटी कंपनीत नोकरीस लागल्यावर देखील क्लाऊड कॉम्पुटिंग, ऍमेझॉन वेब सर्विस, सायबर सेक्युरिटी अशा क्षेत्रात काम करताना विद्यार्थ्यांचा नेटवर्किंग व प्रोग्रामिंग फंडामेंटल्सचा पाया पक्का झाल्यामुळे बढतीसाठी व प्रोजेक्ट मिळवण्यास मदत होत आहे. प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी सेंटरच्या कोर्सेसचा लाभ विभागातील अधिकतम विद्यार्थ्यांना घेता येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. प्राध्यापकांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ .पदमसिंह पाटील, आ. राणाजगजितसिंह पाटील, विश्वस्त मल्हार पाटील, सर्व विश्वस्त, व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे, प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, सर्व विभागप्रमुख व प्राध्यापकांनी अभिनंदन केले