नळदुर्ग किल्ल्यातील स्वच्छता अभियानात पर्यटन जनजागृती संस्थेचा सहभाग
- Get link
- X
- Other Apps
नळदुर्ग किल्ल्यातील स्वच्छता अभियानात पर्यटन जनजागृती संस्थेचा सहभाग
धाराशिव दि.१ (प्रतिनिधी) - नळदुर्ग येथील भुईकोट किल्ल्यातील स्वच्छता अभियानामध्ये पर्यटन जनजागृती संस्था उस्मानाबाद संचलित पर्यटन विकास समिती धाराशिवच्यावतीने दि.१ ऑक्टोबर रोजी सहभाग नोंदविला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दि.२ ऑक्टोबर जयंती निमित्त दि.१६ सप्टेंबर ते दि.२ ऑक्टोंबर या पंधरवड्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून दि.१ ऑक्टोंबर रोजी देशातील गडकिल्ले, नदी व इतर ठिकाणी एक तारिख एक तास श्रमदानातून स्वच्छता अभियानाचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत भारत सरकार माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो सोलापूर व पर्यटन जनजागृती संस्था उस्मानाबाद संचलित पर्यटन विकास समिती धाराशिव यांच्यावतीने नळदुर्ग येथील भुईकोट किल्ल्यात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात आ राणाजगजितसिंह पाटील यांनी सहभाग घेतला होता. किल्ल्यातील उपली बुरुज, नरमादी धबधबा, प्रवेशद्वार आदी भागातील स्वच्छता करण्यात आली. यावेळी पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज नळे म्हणाले की, महाराष्ट्रातील भल्या मोठ्या जागेतील भुईकोट किल्ला आहे. धाराशिव जिल्ह्याचेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचे हे वैभव असून हा किल्ला राज्याच्या राजा आहे. त्यामुळे या गड किल्ल्याचे जतन करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. तसेच या उपक्रमाला नागरिकांचा मोठ्या उत्साहाने प्रतिसाद मिळाला असून पर्यटन विकास समितीच्या माध्यमातून आम्ही यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. तर क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, सहाय्यक अधिकारी अंबादास यादव यांच्या हस्ते पर्यटन विकास समितीने अभियानात सहभागामुळे प्रमाणपत्र देऊन समितीच्या पदाधिकाऱ्यांना गौरविण्यात आले. या अभियानात पर्यटन विकास समितीचे सचिव देविदास पाठक, सदस्य अभिमान हंगरगेकर, सहसचिव अब्दुल लतिफ, उपाध्यक्ष गणेश वाघमारे, कोषाध्यक्ष बाबासाहेब गुळीग, सदस्य विजय गायकवाड, कैलास पवार, नळदुर्ग विभाग पर्यटन विकास समितीचे संयोजक जयभीम वाघमारे यांच्यासह इतर विभागातील अधिकारी कर्मचारी, पत्रकार बांधव, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, पर्यटक, नगर परिषद प्रशासन विभागातील अधिकारी कर्मचारी, सफाई कामगार, बचत गटांतील महिला, धरित्री महाविद्यालय, बालाघाट महाविद्यालय व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps