लिंगायत स्मशान भूमीतील सुशोभिकरणाची कामे करण्यात यावे


लिंगायत स्मशान भूमीतील सुशोभिकरणाची कामे करण्यात यावे 
धाराशिव दि.४ (प्रतिनिधी) - शहरातील लिंगायत समाज स्मशान भूमिती विकास कामे करुन तेथील गैरसोयी दूर कराव्यात अशी मागणी शिवा संघटनेच्यावतीने एका निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांकडे केले आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव शहरातील नागनाथ मंदिर परिसरात लिंगायत वाणी यांच्यासह इतर समाजाची स्मशानभूमी असून अंत्यविधीसाठी या स्मशानभुमीत सुशोभीकरणासाठी विकास कामे करणे आवश्यक आहेत. त्यासाठी सुरक्षित भिंत, ऊन वारा व पाऊस यापासून संरक्षण व्हावे. तसेच अंत्यविधीसाठी आलेल्या महिला व पुरुष यांच्यासाठी निवारा शेड, वीज व पाण्याची व्यवस्था, रस्ता यासह इतर सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी केली आहे. यावेळी शिवा संघटनेचे शहराध्यक्ष महेश उपासे, गणेश वाघमारे, संजय गजधने आदींसह इतर उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !