धुरगुडे यांनी अग्रीम पीक विमा मिळण्याची उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे मागणी
धुरगुडे यांनी अग्रीम पीक विमा मिळण्याची उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे मागणी
धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील महसूल मंडळांना अग्रीम पीक विमा मंजूर व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी याबाबत पाठपुरावा केला. यामध्ये धाराशिवचे जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विमा देण्यासाठी शिफारस केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी विजयादशमी सणाच्या अगोदर शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा देण्यासाठी आपल्या स्तरावरून कार्यवाही करू असे बैठकीत सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप, युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे, लोहारा तालुका अध्यक्ष सुनिल साळुंखे, युवक जिल्हा सरचिटणीस शमसोद्दिन जमादार आदी उपस्थित होते.