जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळांना अग्रीम पीक विमा देण्यात यावा
- Get link
- X
- Other Apps
धाराशिव दि.४ (प्रतिनिधी) - जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन सह इतर सर्वच पिके करपून गेले आहेत. मात्र तांत्रिक अडचणीमुळे काही मंडळांना अग्रीन रक्कम देण्यापासून वंचित ठेवले आहे. हा शेतकऱ्यावर अन्याय असून सर्वच ५७ महसूल मंडळातील पिकांसाठी नुकसानीची अग्रीम रक्कम देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अप) चे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मंत्रालयात केली आहे.
जिल्ह्यातील ५७ महसूल मंडळांना पीक विमा अग्रीम मंजूर करण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विमा कंपनीला केलेली आहे. मात्र पीक विमा कंपनी ४० महसूल मंडळाचा विषय आहे असे पीक विमा कंपनीकडून वारंवार सांगितले जाते. त्यामुळे ५७ महसूल मंडळांना अग्रीम पीक विमा विजयादशमी सणाच्या अगोदर शेतकऱ्यांना देण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेश द्यावेत असे नमूद केले आहे. यावेळी आ सतीश चव्हाण, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, भूम तालुकाध्यक्ष ऍड.रामराजे साळुंखे, भूम परंडा विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप, माजी सैनिक सेल जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, परंडा तालुकाध्यक्ष अमोल काळे, सतीश घोडेराव, मलंग शेख, वाशी तालुकाध्यक्ष अविनाश काटवटे आदी उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps