शरण पाटील यांचा मराठा आरक्षणाच्या साखळी उपोषणाला जाहीर पाठींबा
शरण पाटील यांचा मराठा आरक्षणाच्या साखळी उपोषणाला जाहीर पाठींबा
मुरुम दि.३० (प्रतिनिधी) - मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात सरसकट समावेश व्हावा, यासाठी शासनाकडे अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. मागणी पूर्ण न झाल्यामुळे आमरण उपोषण करत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी मुरुम शहरातील सकल मराठा समाजाच्यावतीने २ दिवसांपासून शिवाजी चौकात दि.३० ऑक्टोबर रोजी साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषण स्थळी जाऊन महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील यांच्याकडून नगर शिक्षण विकास मंडळ, मुरुऔम व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसटच्या वतीने जाहीर पाठिंब्याचे पत्र उपोषणकर्त्यांना देण्यात आले. यावेळी उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी बसवेश्वर चौक ते शिवाजी चौकापर्यंत पदयात्रा काढून घोषणाबाजीसह शेकडो युवक कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते. याप्रसंगी शरण पाटील मराठा आरक्षणाच्या बाबत बोलताना म्हणाले की, उपोषणकर्त्यांची सरकारने तात्काळ दखल घ्यावी, आरक्षणाचा प्रश्न ताबडतोब निकाली काढावा. या साखळी उपोषणास आमचा जाहीर पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. उपोषणकर्त्यांमध्ये हणमंत बेंडकाळे, तानाजी बेंडकाळे, नेताजी बेंडकाळे, अंकुश बेंडकाळे, अनिल बेंडकाळे, बालाजी बेंडकाळे, सुरेश बेंडकाळे आदी. यावेळी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भालेराव, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रकाश आष्टे, रफिक तांबोळी, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, मुख्याध्यापिका महानंदा रोडगे, सूर्यकांत पाटील, विक्रम दासमे, गौस शेख, योगेश राठोड, राजू मुल्ला, उल्हास घुरघुरे, डॉ. रवि आळंगे, डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी, डॉ. रविंद्र गायकवाड, प्रा. कल्याणी टोपगे, महेश माशाळकर, डॉ. पुरुषोत्तम बारवकर आदींची उपस्थिती होती. आरक्षणाच्या संदर्भात अजित चौधरी, मोहन जाधव, श्रीधर इंगळे, शंकर इंगळे, संजय सावंत, हनुमंत वागदरे, संजय बेंडकाळे, सचिन शिंदे आदी परिश्रम घेत आहेत.