तुळजाभवानी मातेची मुरली अलंकार महापूजा
तुळजाभवानी मातेची मुरली अलंकार महापूजा
धाराशिव दि.१९ (प्रतिनिधी) - शारदीय नवरात्र महोत्सवात दि.१९ ऑक्टोबर रोजी गुरुवारी पाचव्या माळेच्या दिवशी तुळजाभवानी देवीची ललित पंचमीनिमित्त मुरली अलंकार महापूजा करण्यात आली. तुळजाभवानी देवीचे हे रुप अत्यंत मनमोहक आहे.
तुळजाभवानी देवीची नित्योपचार पुजा व अभिषेक पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली. चौथ्या माळेपासून विविध अलंकार रुपातील देवीजींची पूजा मांडण्यात येत आहे. तर दररोज नियमित तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात. उद्या २० ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा, २१ ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि २२ ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहे. दरम्यान, १८ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता चौथ्या माळेच्या दिवशी देवीजींची छबिना मिरवणूक गरुड वाहनांवरुन काढण्यात आली.