धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी रामदास कोळगे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन व्यक्त होत आहे.
वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल लॉज मालकावर गुन्हा दाखल धाराशिव शहरातील देह विक्री करून घेणाऱ्या दलांचे सत्र संपता संपेना ! धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) - धाराशिव शहरातील तांबरी विभागातील किरण महादेव गुरव व्यवसाय (हॉटेल लॉज मालक) यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी दि. ४ एप्रिल रोजी ३ वाजण्याच्या सुमारास जुनोनी रोड अंबेहोळ रोडच्या लगत असलेल्या हॉटेल बालाघाट कॅफेटेरिया व्हेज नॉनव्हेज बिअर बार रेस्टॉरंट ऍड लॉजवरील २ महिलांना वाणिज्यिक प्रयोजनासाठी आश्रय देऊन त्यांना ग्राहकांच्या मागणी प्रमाणे लैंगीक समागमनासाठी पराववृत्त करुन तिला वैश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून तिच्यावरती उपजिवीका करीत असताना पंचा समक्ष मिळून आला. या ठिकाणी पोलीसांनी छापा टाकून कारवाई करुन यातील पिडीत २ महिलांची सुटका केली. या प्रकरणी सरकारतर्फे दिलेल्या तक्रारीवरून गुरव यांच्या विरोधात भा.द.स. कलम ३७० सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम ४, ५, ६ व ७ अन्वये धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटर वर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) - जिल्ह्यासह जिल्ह्याच्या विविध भागात वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यातील काही नामांकित हॉटेल्स, लॉज आदी ठिकाणी तर काही स्पा सेंटर आधुनिक फॅशनेबल व ग्राहकांना गोंडस सेवा देण्याच्या नावाखाली हा गोरख धंदा राजरोसपणे शहराच्या मुख्य चौकात सुरू असल्याचे वारंवार समोर आले आहे. अशाच एका वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या औ रा (Aura) स्पा सेंटरवर पोलिसांनी गिर्हाईक म्हणून पंटरला पाठवून धाड टाकली. या धाडीत व्यवसाय करणारे व करून घेणारे यांना रंगेहात पकडले. यावेळी पोलिसांनी पाच महिलांची सुटका केली असून व्यवस्थापक, चालक व इतर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, चार आरोपींपैकी सर्वच्या सर्व आरोपींनी पोलिसांना हुलकावणी चक्क पोलिसांच्या हातावर तुरी देत धूम ठोकली आहे. ही कारवाई प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांनी दि.२ जून केली आहे. य...
उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप ! भूम, वाशी व परंडा तालुक्यातील २० ग्रामपंचायतचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन, सदस्यांचा प्रवेश सर्वच राजकीय पक्षांना जबर हादरा उस्मानाबाद दि.१६ (प्रतिनिधी) - जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप झाला असून भूम, परंडा व वाशी मतदारसंघात तब्बल २० ग्रामपंचायतच्या सरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, ठाकरे सेनेचे शाखाप्रमुख यांच्यासह शेकडो जणांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते व जय हनुमान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कांबळे यांच्या उपस्थितीत पुणे येथील संपर्क कार्यालयात दि.१६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप घडवून आणून खरोखरच प्रस्थापितांना जबर हादरा देण्यात पालकमंत्री प्रा सावंत यशस्वी ठरले आहेत. शिवसेनेमध्ये फूट पडल्यापासून जिल्ह्यात शिवसेनेतील कार्यकर्त्यांचा शिवसेना (बा ळा साहेब) मध्ये प्रवेश करण्याचा ओढा लागलेला असून शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट...