भाजपा महिला मोर्चाच्या तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी पाटील

भाजपा महिला मोर्चाच्या तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी पाटील

धाराशिव दि.२ (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील निशिगंधा पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र जिपच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
पाटील यांचा स्वतःचा दूधाचा व्यवसाय असून त्यांचा आदर्श घेऊन गावातील अनेक महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केले आहेत. तर बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी गावातील अनेक महिलांचे संघटन केले असून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली आहे. यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा नंदाताई पुनगुडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, काक्रंबा येथील महिला उपस्थित होत्या.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !