धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची भव्य सवाद्य मिरवणूक

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची भव्य सवाद्य मिरवणूक

उमरगा दि.१८ (प्रतिनिधी) - सारनाथ बौध्द विहाराच्यावतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तथागत गौतम बुध्द यांच्या मूर्तीची उमरगा शहरातून भव्य सवाद्य मिरवणूकीत लेझीम पथकाने विविध कला प्रकाराने सर्वांचे लक्ष वेधले.

शहरातील भीमनगर येथील सारनाथ बौध्द विहाराच्यावतीने ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त   दि.१४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी भिमनगर येथुन शहरातील प्रमुख मार्गावरून तथागत गौतम बुध्द यांच्या मूर्तीची भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत मुला- मुलींच्या लेझीम पथकाच्या विविध कलाप्रकाराने सर्वांचे लक्ष वेधले होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक एन. आर. गायकवाड, बीट अमंलदार अतुल जाधव, दत्तात्रय सरपे, अविनाश काळे यांच्या हस्ते तथागत गौतम बुध्द यांच्या पुतळ्याचे पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी शाक्यदिप कांबळे यांनी सामूहिक बुध्दवंदना घेतली. सारनाथ बौध्द विहारापासुन निघालेली सवाद्य मिरवणूक राष्ट्रीय महामार्ग, महादेव मंदिर, सय्यदबाशा दर्गा, जुनीपेठ ते परत सारनाथ विहारापर्यंत काढण्यात आली. मिरवणुकीत संतोष कांबळे (सोलापूर) यांच्या मार्गदर्शनाखालील सारनाथ बौध्द विहार लेझीम संघातील मुले व मुलींच्या विविध कला प्रकाराच्या सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. सचीन माने, जीवन सरपे, अजय सरपे, यशपाल सरपे, आकाश सरपे, आदित्य सरपे, बाळु माने, दिनेश सरपे, सहदेव सोनकांबळे, महादु गायकवाड, विकास सरपे, विलास सरपे, नितीन कावळे, फुलचंद कांबळे, सतीश कांबळे, ऋषी सरपे, अक्षय सरपे, रत्नदिप भालेराव, मल्हारी सुर्यवंशी यांच्यासह सारनाथ बौध्द विहार पंचकमेटी व लेझीम पथकाच्या सर्व सदस्यांनी मिरवणूकीच्या यशस्वितेसाठी पुढाकार घेतला.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !