नवरात्र महोत्सवात रुग्णवाहिका व आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती

नवरात्र महोत्सवात रुग्णवाहिका व आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती


धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) - श्री तुळजाभवानी देवीची शारदीय नवरात्र महोत्सव यात्रा दि.६ ते ३० ऑक्टोंबर या कालावधीत मोठ्या प्रमाणात यात्रा भरणार आहे. यात्रेमध्ये यात्रेकरुंना आरोग्य विभागाच्यावतीने उपचारात्मक व प्रतिबंधात्मक सेवा देण्यात येणार आहे. यात्रा कालावधीत तात्काळ आरोग्य सेवा देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर येथे अधिकारी, कर्मचारी व रुग्णवाहिका संदर्भीय आरोग्य सेवा देण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे.

या कालावधीत तुळजापूर येथे २१ ठिकाणी प्रथमोपचार केंद्र ठेवण्यात आलेली आहेत. तसेच १०८ रुग्णवाहिका ३ उपलब्ध करण्यात आलेल्या असून या प्रथोमोपचार केंद्रात पुरेशा प्रमाणात औषधीसाठा उपलब्ध केलेला आहे. त्यामुळे प्रथमोपचार केंद्रात यात्रेकरूंना आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. तसेच कालावधीत श्री क्षेत्र तुळजापूर येथे पायी येणाऱ्या यात्रेकरुंसाठी यात्रा मार्गावर वडगाव, पाटोदा मोड, आष्टामोड, माकणी, तामलवाडी, कसई, माळुंब्रा, बोरी, तीर्थ (बु), देवसिंगा, ताकविकी, कांक्रंबा, तुरोरी, येणेगुर, तलमोड, नळदुर्ग, जळकोट, लोहारा, नारंगवाडी या १९ ठिकाणी प्रथमोपचार केंद्र सुरू केलेली आहे.

शहरात उपाययोजनेसाठी १० आरोग्य पथके तयार केलेली असून या पथकास गल्ली, वार्डाचे वाटप करून या भागातील सर्व पाणीसाठ्याचे हॉटेल, धाबे व खाणावळ येथील पाण्याचे निर्जंतुकीकरण करून पाणी शुद्धीकरण झाल्याची खात्री ओ.टी. टेस्ट घेऊन करण्यात येते. ओ.टी. टेस्ट निगेटीव्ह आल्यास मदर सोल्युशन किंवा मेडीक्लोरद्वारे पाणी साठ्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. त्यामुळे यात्रेकरूंनी या आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. एल. हरिदास, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.इस्माईल मुल्ला यांनी केले आहे.         


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !