संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान जमा करण्याची मागणी
संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान जमा करण्याची मागणी
परंडा दि.२० (प्रतिनिधी) - शहर व तालुक्यातील संजय गांधी निराधार (दिव्यांग) अनुदान योजने अंतर्गत लाभार्थ्यांचे जुलैपासून अद्यापपर्यंतचे वेतन तात्काळ वाढीव अनुदानासह जमा करावे, अशी मागणी दिव्यांग उद्योग समूहाच्यावतीने तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे दि.२० ऑक्टोबर रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, संजय गांधी निराधार योजने अंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारे वेतन जुलै महिन्यापासून मिळालेले नाही. तसेच आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या विविध सणासुदीच्या मुहूर्तावर रखललेले वेतन जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ वाढीव निधीसह वितरित करावे अशी मागणी केली आहे. दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा जिल्हाप्रमुख तानाजी घोडके, तानाजी सांगडे, गोरख देशमाने, गणेश जाधव, रावसाहेब खरसडे, संतोष कुलकर्णी, अशोक भराटे, मधुकर मोटे आदीसह दिव्यांग उपस्थित होते.