औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील प्रथम वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत
औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील प्रथम वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत
धाराशिव दि१८ (प्रतिनिधी) - तालुक्यातील आळणी येथील धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरज ननवरे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून आर.पी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गाजी शेख व डॉ.दिनकर झेंडे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ.शेख यांनी मानवी आयुष्यात औषधाचे अनन्य साधारण महत्व व औषध निर्माण शास्त्रातील करिअरच्या वेगवेगळ्या संधीची माहिती सांगितली. तर डॉ.झेंडे यांनी प्रथम वर्षातील नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना उपलब्ध शैक्षणिक सोयी सुविधांचा योग्य उपयोग करून आपले करिअर चांगल्या पद्धतीने कसे घडवावे ? याबद्दल माहिती दिली. तसेच डॉ.सुरज ननवरे यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे आश्वासन दिले. तसेच विद्यार्थ्यांनी फार्मसी क्षेत्रात आपले करिअर निवड केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे स्वागत करून फार्मासिस्ट या नात्याने रुग्णसेवेसाठी सदैव कटिबद्ध राहण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.धस यांनी तर आभार प्रा.नागरगोजे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री भैरवनाथ निसर्ग मंडळाच्या बी.फार्मसी व डी. फार्मसीचे शिक्षक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.