जल संजीवनी प्रकल्पातील २५ शेतकऱ्यांची माढा येथे अभ्यास भेट३ गुंठा मॉडेल व सेंद्रिय शेती प्लॉटची पाहणी

जल संजीवनी प्रकल्पातील २५ शेतकऱ्यांची माढा येथे अभ्यास भेट

३ गुंठा मॉडेल व सेंद्रिय शेती प्लॉटची पाहणी

धाराशिव दि.५ (प्रतिनिधी) -  युनायटेड वे मुंबई संस्थेच्या अंमलबजावणीमध्ये जलसंजीवनी प्रकल्पामधील सेंद्रिय शेतकरी यांनी माढा येथील गुरु भांगे यांच्या ३ गुंठा मॉडेल, प्रकाश कदम यांच्या सेंद्रिय शेती प्लॉट आणि श्रमिक महिला बचत गटाच्या व्यवसाय युनिटला भेट देऊन मार्गदर्शन घेतले. संशोधनात्मक असलेला या प्रकल्पाच्या अभ्यास भेटीत  लोहारा मधील मार्डी, नागराळ, उंडरगाव आणि हिप्परगारवा तर तुळजापूरमधील कार्ला आणि वानेगाव गावातील सेंद्रिय शेती करणारे २५ शेतकरी आणि जल संजीवनी प्रकल्पाचे टीम लीडर भिमाशंकर ढाले,   समूह संघटक अजिज तांबोळी, वरिष्ठ कृषितज्ञ वैभव सिंग व विशाल पटके , कृषितज्ञ नंदकिशोर माने, नितिन गडदे, श्रेयस इंगोले, कृषीदूत अस्लाम शेख, शुभम साखरे, नारायण क्षीरसागर, नेताजी देवकर, नितीन देवकर आदी सहभागी होते.

प्रकल्प कार्यक्षेत्रातील शेतकरी यांना सेंद्रिय शेती आणि मल्टीलियर शेतीचे महत्व समजावे तसेच  अधिकाधिक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळावे हा उद्देश समोर ठेवून या अभ्यास भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास भेटीमध्ये गुरुनाथ भांगे यांनी ३ गुंठा मॉडेलबाबत सविस्तर मार्गदर्शन करीत शेतकऱ्यांनी शेती प्रक्रिया उद्योगावर भर देण्याचा प्रयत्न करावा. तर प्रकाश कदम यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व आणि त्याच्या नियोजनावर मार्गदर्शन केले. श्रमिक महिला बचत गटाच्या सुलभा कदम यांची दाल मिल, ऑईल मिल, सेंद्रिय ऊसाचा रस या व्यवसाय उभारणीवर मार्गदर्शन केले.
संशोधनावर आधारित असलेल्या जल संजीवनी प्रकल्पा अंतर्गत पुर्नजीवी शेती, शून्य किंवा अल्प मशागत, सेंद्रीय शेती आदी बाबीवर मार्गदर्शन आणि अर्थ सहाय्य करण्यात येत आहे. जल संजीवनी कृषीतज्ञ टीम शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करीत असून अभ्यास भेटी, प्रशिक्षण यामुळे शेतकरी आपल्या बांधावर सेंद्रिय निविष्टा तयार करून प्रकल्पामध्ये सक्रीय सहभाग घेत आहेत.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !