उद्यापासून श्री भवानी शंकर मंदिरात नवरात्र उत्सवास प्रारंभ

उद्यापासून श्री भवानी शंकर मंदिरात नवरात्र उत्सवास प्रारंभ

परंडा दि.१४ (प्रतिनिधी) - शहराचे अराध्ये दैवत श्री भवानी शंकर मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. शहराच्या प्रवेशद्वारा लगत श्री भवानी शंकर मंदिर आहे. हे मंदिर सुमारे ३०० वर्षापासून जागृत देवस्थान असून या मंदिरत    अंबाबाई भवानी माता मुर्ती व दक्षिण मुखी एका शिळात असलेली श्री हनुमान मुर्ती तसेच सुर्वात मोठी महादेवाची पिंड असेलले मुर्ती या तीन मुर्ती असलेले एकाच मंदिरात असल्याने त्या मंदिराला भवानी शंकर मंदिर असे म्हणतात. या मंदिराची अख्यायिका अशी आहे. या मंदिरात निसर्गाप्रमाणे तिन्हीही ऋतूमध्ये   या तीन मुर्तीचा उत्साह मोठ्या प्रमाणात केला जातो. पावसाळ्यात श्रावण महिन्यात श्री भवानी शंकर मंदिरात श्री महादेवाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी  परंडा तालुक्यातील भावीक मोठ्या प्रमाणात दर्शन घेण्यासाठी  भावीकांची गर्दी असते. तसेच हिवाळ्यात श्री भवानी माता यांचा नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तर उन्हाळ्यामध्ये श्री हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. या मंदिरात भवानी माता श्री हनुमानाची मुर्ती श्री महादेवाची मुर्ती असे तीन देवतांची मुर्ती असलेले परंडा शहरातच नव्हे संबंध धाराशिव जिल्हयात एकमेव परंडा या शहरामध्ये हे मंदिर पहावयास मिळते अशी माहिती या मंदिराचे विश्वत्त पुजारी किशोर महाराज बैरागी यांनी दैनिक यशवंतशी बोलताना दिली. नवरात्र मोहत्सव कार्यक्रम पुढीलप्रमाणे दि. १५ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता ध्वजारोहन व घटस्थापना दि. १९ ऑक्टोंबर रोजी कुंकु मार्चन देविची एक हजार नावे उच्चारून कुंकू वाहण्याचा कार्यक्रम दि.२२ ऑक्टोबर रोजी पुण्याह वाचन, वैदीक हावण, शप्त शक्ती पठण सायंकाळी ५.१५ ते ८.५  वाजेपर्यंत कृष्णा डबली पूर्णाहुती ८.१५ वाजेपर्यंत दि. २४ ऑक्टोबर रोजी सिमोलंगण सायं ५.४५ ते रात्री १० वाजेपर्यंत व देविची निद्रा रात्री ११ वाजता,                                   दि.२८ रोजी देविची निद्रा जागृती पहाटे ५ वाजता तसेच हंसराज महिला भजनी मंडळाचे भजन दररोज सायं ४ ते ६.३०  पर्यंत ६८ वर्षाची अखंड सेवा असा श्री भवानी शंकर मंदिरात दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा होत आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !