होऊ द्या चर्चा, करुया बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड अभियानास भुसणी, येणेगुर येथे प्रतिसाद

होऊ द्या चर्चा, करुया बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड अभियानास भुसणी, येणेगुर येथे प्रतिसाद



धाराशिव दि.७ (प्रतिनिधी) - उमरगा तालुक्यातील भुसनी व येणेगुर येथे होऊ द्या चर्चा, करूया बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड या अभियानच्या माध्यमातून जिल्ह्यासह संपूर्ण जनतेची भाजप प्रणित  सरकारने कशी व कोणत्या पद्धतीने फसवणूक केली आहे ? याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार चालू आहे. भुसणी व येणेगुर येथील कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर म्हणाले की, भाजप प्रणित मोदी सरकारने मागील ९ वर्षाच्या काळात किती आश्वासने दिली व त्यापैकी किती सत्यात आली ? तसेच महागाई वाढली, देशावरील कर्ज वाढले, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे राहिले नाही, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, सुरळीत वीज पुरवठा नाही, दुधाला भाव नाही, बेरोजगारी संपली नाही, महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत, इंधनाचे दर वाढले यासारख्या अनेक विषयांवर चर्चा करून सर्व गोष्टीची माहिती देऊन याची चर्चा आपल्या गावातील वाडी, वस्ती, मंदिर, पारावर शहरातील प्रत्येक वार्डात, घरोघरी या ठिकाणी चर्चा करून मोदी सरकारच्या बोलघेवढ्या योजनांचा भांडाफोड करून मतदारांना बोलण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ कैलास पाटील, उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे, तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, कृ.उ.बाजार समिती सभापती रणधीर पवार, विरपक्ष स्वामी, विजय नागने, सुधाकर पाटील, अजित चौधरी, संतोष कलशेट्टी, रवी कोरे, जगदीश मिकरेंगे, परमेश्वर मंडले, युवराज मंडले, आप्पाराव गायकवाड आदींसह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !