#manojjarangepatil#होळी येथे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण
होळी येथे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण
लोहारा दि.२८ (प्रतिनिधी) - मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या प्राणांतिक आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लोहारा तालुक्यातील होळी येथे सकल मराठा समाजाच्यावतीने साखळी उपोषणास दि.२७ ऑक्टोबरपासून सुरुवात करण्यात आली आहे.
जोपर्यंत मराठा समाजाला न्यायालयीन प्रक्रियेमध्ये टिकणारे आरक्षण लागू करण्यात येत नाही. तोपर्यंत हे साखळी उपोषण करण्यात येणार आहे. या काळात आजी, माजी आमदार, खासदार व सर्व पक्षीय राजकीय पक्षाच्या नेत्यांना गाव प्रवेश बंदी तसेच मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी सरोजा बिराजदार, सुनंदा मोरे, देवयानी गायकवाड, आयोद्ध्या बाबळसुरे, आशा जाधव, शशिकला गायकवाड, सुनंदा जाधव, रेखा बाबळसुरे, कमलाबाई जाधव, प्रा. गोविंद जाधव, प्रदीप मोरे, करण बाबळसुरे, संजय मनाळे, अजित जाधव, केशव सरवदे, सतीश माळी, शंकर मोरे युवराज कोकाटे, ओम बिराजदार, अभिषेक जाधव, विठ्ठल गायकवाड, विशाल जाधव यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.