मराठा आरक्षण सरसकट देण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची आमदारांची मागणी

 मराठा आरक्षण सरसकट देण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची आमदारांची मागणी

धाराशिव दि.१ (प्रतिनिधी) - मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन तात्काळ बोलवावे, अशी मागणी आमदाराच्या एका शिष्टमंडळाने राज्यपालाकडे एका निवेदनाद्वारे दि.३१ ऑक्टोबर रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, राज्यातील मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे हे दि.२९ ऑगस्टपासून जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे १७ दिवस आमरण उपोषणास बसले होते. त्यावेळी सरकारच्यावतीने ४० दिवसांमध्ये मराठा आरक्षण देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. दि.२४ ऑक्टोबर रोजी सरकारला दिलेली मुदत संपूनही राज्य सरकारने मराठा समाजास आरक्षणाबाबत ठोस कार्यवाही केलेली नसल्यामुळे जरांगे यांनी पुन्हा दि.२५ ऑक्टोबरपासून एकदा आमरण उपोषणास बसलेले आहेत. राज्यातही ठिकठिकाणी हिंसक आंदोलने चालुच आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत अन्नाचा एक कणही खाणार नाही व वैद्यकीय उपचारही घेतले जाणार नाहीत अशी कठोर भूमिका जरांगे यांनी घेतलेली आहे. त्यामुळे समाजात असंतोषाची भावना तीव्र आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर मराठा तरुण आत्महत्येसारखी दुदैवी पावले उचलत आहेत. अद्यापपर्यंत सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत कोणती कार्यावाही केली याबाबतची कुठलीही माहिती दिलेली नाही. तसेच आरक्षण कसे देणार ? याबाबत आपली ठोस भूमिकाही मांडलेली नाही. त्यामुळे मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (१) व्दारे आपणास प्राप्त असणाऱ्या अधिकाराचा वापर करुन विधानसभेचे विशेष अधिवेशन तात्काळ बोलवावे अशी मागणी आमदार सर्वश्री कैलास पाटील, बाळासाहेब आजबे, राहुल पाटील, बाळासाहेब पाटील, राजू नवघरे, माधवराव जवळगावकर, निलेश लंके, राजेश पाटील, मोहनराव हंबर्डे आदींनी राज्यपालाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !