निराधार, विधवा महिलांना कुलकर्णी यांच्या हस्ते साहित्याचे वाटप
निराधार, विधवा महिलांना कुलकर्णी यांच्या हस्ते साहित्याचे वाटप
धाराशिव दि.६ (प्रतिनिधी) - बंधन कोननगर संस्थेच्या माध्यमातून २५ निराधार व विधवा महिलांना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते दि.६ नोव्हेंबर रोजी बंधन कोननगर कार्यालयामध्ये साहित्याचे वाटप करण्यात आले.
जिल्ह्यातील ३ हजार एकल, विधवा व परितक्ता महिलांना स्वंयरोजगार उपलब्ध करुन देण्यासाडी बंधन कोननगर व बजाज फिनसर्व्ह यांनी मागील २ वर्षात पुढाकार घेवून सतत त्यांना विना परतावा आर्थिक पाठबळ देत रोजगार उपलब्ध (व्यवसाय स्वरुपात) करुन महिला सक्षमीकरणाची महत्वाची जबाबदारी उचलली आहे.
बंधन कोननगर ही सामाजिक संस्था महिलांना जिल्ह्यामध्ये १५ कार्यालय चालु करुन ३ महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे सामाजिक कार्य करीत आहे. तसेच बंधन व बजाज गेल्या २ वर्षामध्ये विधवा, परितक्ता तसेच एकल महिलांना आर्थीक साहाय्य जसे की चप्पल दुकान, बांगडी दकान, किराणा दुकान, शिलाई मशिन, कपड्याचे दुकान आदी व्यवसायासाठी मदत करत आहे. या कार्यक्रमामध्ये बंधन कोननगर एनजीओचे कार्यक्रम अधिकारी फुरकन इस्लाम, जिल्हा समन्वयक अमरिता घोप, बंधन कोननगरचे विभागीय समन्वयक, शाखा व्यवस्थापक प्रज्ञावंत रणदिवे, खेमचंद रेगर व कर्मचारी आदी उपस्थित होते.