मराठा आरक्षणासाठी महिलांचे आमरण उपोषण सुरु
मराठा आरक्षणासाठी महिलांचे आमरण उपोषण सुरु
धाराशिव दि.१ (प्रतिनिधी) - सकल मराठा समाजास आरक्षण मिळावे व मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी धाराशिव येथे सकल मराठा समाजाच्यावतीने महिलांनी दि.१ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, मराठा आरक्षणासाठी जरांगे यांनी दि.२४ ऑक्टोबरपासून अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. मात्र शासनाने आजतागायत या उपोषणाची दखल घेतलेली नसल्यामुळे जरांगे यांना समर्थन देण्यासाठी व सकल मराठा समाजास आरक्षण मिळावे तसेच आंदोलनकर्त्यांवरील दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनिषा राखुंडे व शिलावती देशमुख यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.