उर्वरित तालुक्यांचा अग्रीम पीक विम्यामध्ये समाविष्ट करण्यासह संपूर्ण जिल्ह्याचे दुष्काळ जाहीर करावा

उर्वरित तालुक्यांचा अग्रीम पीक विम्यामध्ये समाविष्ट करण्यासह संपूर्ण जिल्ह्याचे दुष्काळ जाहीर करावा


धाराशिव दि.२ (प्रतिनिधी) - तुळजापूर, भूम, परंडा,  कळंब व उमरगा या तालुक्यांचा अग्रीम पीक विम्यामध्ये समावेश करण्यात यावा. तसेच संपूर्ण जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे दि.२ नोव्हेंबर रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, यावर्षी खरीप व रब्बी दोन्ही हंगाम पावसामुळे पूर्णतः शेतकऱ्यांच्या हातातून गेलेले आहेत. उत्पन्न तर सोडाच परंतू सद्य परिस्थितीत जनावरे सांभाळायचे सुद्धा अवघड झाले आहे. तसेच प्रत्येक तालुक्यातील साठवन तलावातून शेतीसाठी पाणी उपसण्यासाठी शेतकऱ्यांना मनाई करण्यात आली असून सर्व विद्युत पंपाची वीज तोडण्यात आली आहे. कारण समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे सर्व तालुक्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. एकीकडे पुढील काळामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी मोठी समस्या निर्माण होणार असल्यामुळे शासनाने ही कारवाई केली आहे. तर दुसरीकडे पाऊस कुठेही झालेला नसताना देखील ५ तालुके अग्रीममधून वगळलेच कशी ? याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने वेळोवळी आंदोलने करण्यात आल्यामुळे पंचनामे करण्यात आले. यावेळी संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी अशी ग्वाही दिली की हे सर्व तालुके अग्रीममध्ये समाविष्ट झालेले आहेत. परंतू ही निव्वळ शेतकऱ्यांची थट्टा आहे. राजकारण्यांप्रमाणे आता प्रशासकीय अधिकारी सुद्धा शेतकऱ्यांची थट्टा करत आहेत की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटना सहन करणार नाही. जर हा निर्णय बदलला नाही तर शेतकऱ्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे तात्काळ सर्व तालुक्यांचा अग्रीममध्ये समावेश करून घेण्यासह संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने  जिल्ह्यामध्ये कुठेही राष्ट्रीय महामार्ग अडवून रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी दिला आहे. यावर धनाजी पेंदे, कल्याण भोसले, राजाभाऊ हाके, अभय साळुंके, चंद्रकांत साळुंके, विश्वास आडेकर, चंद्रकांत साळुंके, विश्वास भोसले, सुनील औटी, संजय पाटील व युवराज माळी आदींच्या सह्या आहेत.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !