छावाच्या कांदा अनुदानासाठीच्या आंदोलनाला यश शेतकऱ्यांकडून फटाके फोडून जल्लोष
- Get link
- X
- Other Apps
छावाच्या कांदा अनुदानासाठीच्या आंदोलनाला यश
परंडा दि.८ (प्रतिनिधी) - छावा संघटनेच्यावतीने लवकरात लवकर कांदा अनुदान वाटप करण्याची मागणी केली होती. अन्यथा दि.८ नोव्हेंबर रोजी शोले स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दि.३० ऑक्टोबर रोजी एका निवेदनाद्वारे देण्यात आला होता. तेव्हापासूनच या शोले स्टाईल आंदोलनाची चर्चा तालुकाभर होती. त्यानुसार दि.८ नोव्हेंबर रोजी छावाचे पदाधिकारी व शेतकरी आंदोलनाच्या तयारीत असताना पोलीस प्रशासनाच्यावतीने पीएसआय घोंगडे, कॉन्स्टेबल अडसूळ, परंडा बीट अंमलदार गुंडाळे, शेवाळे, डिकुळे आदींनी कृषी उत्पन्न बाजार समिती, निबंध कार्यालय व छावाच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा घडवून आणली. परंतू प्रशासनाकडून चालढकलपणा केल्याने पदाधिकाऱ्यांचे समाधान न झाल्याने मराठवाडा संपर्कप्रमुख अमर शेख, जिल्हा उपाध्यक्ष आकाश जेधे, तालुकाध्यक्ष्ष सुधीर लटके, छावा शेतकरी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल गाढवे, शेतकरी पांडुरंग गरड, संतोष बोराडे, बापू धनवे, महादेव गरड, परमेश्वर लटके आदींनी पोलीस प्रशासनास चकवा देत बाजार समितीच्या मागच्या बाजूस असणाऱ्या पाण्याच्या टाकीवर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास चढले. जोपर्यंत कांदा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार नाही. तोपर्यंत खाली उतरणार नाही असा पवित्रा घेतला. यावेळी दीपक गरड, सीताराम सातपुते, पृथ्वीराज पाटील, हरिभाऊ आदमीले, अभिलाष सुर्यवंशी, शहाजी साळुंखे, संदीप गरड, राम आणीकर, सचिन कडबने, औदुंबर पाटील, प्रशांत गरड, युवराज गरड, श्रीहरी शिंगारे, अक्षय शिंगारे, सौरव कोकाटे, विशाल शेळके, अशोक खैरे आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.
पोलीस प्रशासनाकडून विनंती करून देखील आंदोलक आपल्या मागण्यावर ठाम होते. आंदोलकांकडून विविध प्रकारच्या घोषणा देण्यात येत होत्या. शेवटी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाल्याचा मेसेज आल्यानंतर आंदोलन सुखरूपपणे खाली उतरले. कांदा अनुदान मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले असून अनुदानामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
- Get link
- X
- Other Apps