दारुसाठी फाटकी नोट दिल्याच्या कारणावरून मारहाण केल्या प्रकरणी ॲट्रॉसिटी दाखल

दारुसाठी फाटकी नोट दिल्याच्या कारणावरून मारहाण केल्या प्रकरणी ॲट्रॉसिटी दाखल

धाराशिव दि.४ (प्रतिनिधी) - एका हॉटेलमध्ये दारू घेण्यासाठी गेलेल्या युवकास १०० रुपयांची नोट फाटकी का दिली ? या कारणावरून मारहाण केली. तसेच त्याचे मामा सोडविण्यासाठी आल्या नंतर त्यांनाही मारहाण केली. या;प्रकरणी ३ आरोपी विरोधात ॲट्रॉसिटी अर्थात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील उड्डाण पुलाजवळ ताज हॉटेल जवळ हंगरगा तुळ येथील सुरज दिपक शिंदे, (वय २० वर्षे) हे व त्याचे मामा राजा देविदास भोसले ताज हॉटेल येथे दारु घेण्यासाठी गेले असता १०० रुपयांची फाटकी नोट दिल्याचे कारणावरुन अणदूर येथील आप्पा घुगे, सचिन घुगे व मारुती तेलंग यांनी दि.१ नोव्हेंबर रोजी १.३० वाजण्याच्या सुमारास आरोपींनी फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ करुन तोंडावर हाताने चापटा मारीत मारहाण केली. तसेच फिर्यादीचे मामा हा भांडण सोडवण्यास आला असता नमूद आरोपींनी फिर्यादीच्या मामास  शिवीगाळ करुन पाठीवर बतईने मारुन जखमी केले. या प्रकरणी सुरज शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात कलम ३२४, ३२३, ५०४, भा.दं.वि.सं. सह अ.जा.ज.अ. प्र.का. कलम ३ (१)(आर), ३(१)(एस), ३(२) (व्हिए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !