मराठा आरक्षणासाठी शेळगाव ग्रामपंचायतच्या ५ सदस्यांचे राजीनामे
मराठा आरक्षणासाठी शेळगाव ग्रामपंचायतच्या ५ सदस्यांचे राजीनामे
परंडा दि.२ (प्रतिनिधी) - मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी व आरक्षणाच्या मागणीसाठी परंडा तालुक्यातील शेळगाव येथील राजेंद्र दिगंबर जगताप, विलास दादाराव दैन, योगेश विक्रम काळे, मैनाबाई शहाजी मगर, विद्या रामभाऊ जामदारे या पाच ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या सदस्यत्व पदाचे सामूहिक राजीनामे सरपंच सुलोचना विष्णू शेवाळे यांच्याकडे दि.३१ ऑक्टोबर रोजी दिले आहेत . आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी शेळगाव येथील अश्विनी मगर यांनी साखळी उपोषण करून अन्न त्याग केला आहे. त्यासोबतच विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान सदस्य कैलास दिगंबर मोरे यांनी देखील राजीनामा दिला आहे . मराठा आरक्षणाची धग अगदी ग्रामीण भागात पोहचली असून ग्रामीण भागातील घराघरातून तरुण आंदोलनात सक्रिय सहभागी होताना दिसत आहेत. शनिवार पासून शेळगाव येथे साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. तसेच कँडल मार्च काढण्यात आला. तर करमाळा आगाराच्या बसवरील जाहिरातीतील सरकारच्या तोंडाला काळे फासून निषेध व्यक्त केला.