पशु संवर्धन विभागाच्या विविध योजनेसाठी लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत - पुजारी

पशु संवर्धन विभागाच्या विविध योजनेसाठी 

लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत - पुजारी 

              

धाराशिव दि.९ (प्रतिनिधी) - पशु संवर्धन विभागाच्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यतीन पुजारी यांनी केले आहे.


ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशु पालक व शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देते. त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमाद्वारे ग्रामीण भागाचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.

विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक, शेतकऱ्यांसाठी स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली ४ वर्षे ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवून लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरू करण्यात आली आहे. 

 सन २०२१-२२ पासून जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी सुद्धा संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. शासनाने एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये. यासाठी तयार केलेली प्रतिक्षा यादी सन २०२१-२२ पासून पुढील ५ वर्षापर्यंत म्हणजे सन २०२५-२६ पर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे.त्यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्याची प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केंव्हा लाभ मिळेल ? हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किवा इतर बाबींसाठी नियोजन करता येणे शक्य होणार आहे. त्यानुसार नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गायी- म्हशीचे गट वाटप करणे, शेळी-मेंढीचे गट वाटप करणे, १ हजार मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५ अधिक ३ तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२३-२४ या वर्षात राबविली जाणार आहे. तसेच पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे. त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.  

पशुपालक,  शेतकरी सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करावेत. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ : https://ah.mahabms.com

अँड्रॉईड मोबाईल ॲप्लिकेशनचे नांव : AH.MAHABMS (Google play स्टोरवरील मोबाईल ॲपवर उपलब्ध) अर्ज करण्याचा कालावधी ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर आहे. तर टोल फ्री क्रमांक-१९६२ किंवा १८००-२३३-०४१८ योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील या संकेतस्थळावर व मोबाईल ऍपवर उपलब्ध आहे. विशेष म्हणजे 

अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील. 

 या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरण्यासाठी अत्यंत सुलभ करण्यात आली आहे. तर अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच पशुपालकांनी अर्ज भरण्यासाठी स्वतःच्या मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये. तसेच मागील वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही.

 योजनेबाबत अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याच्या पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उप आयुक्त कार्यालय, तालुका लघु पशु वैद्यकीय सर्व चिकित्सालय अथवा नजीकच्या पशु वैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन पुजारी यांनी केले आहे.

                                     


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !