जरांगे व मराठा आरक्षण यांच्या समर्थनार्थ महिला मोर्चा व महाआरती

जरांगे व मराठा आरक्षण यांच्या समर्थनार्थ महिला मोर्चा व महाआरती

तुळजापुर दि.३ (प्रतिनिधी) - मराठा आरक्षण व मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तुळजापूर येथे शुक्रवार दि.३ नोव्हेंबर रोजी दुपारी मराठा महिला व भगिनींचा भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांनी मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है, एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी व संभाळाच्या कडकडाटात मराठा महिलांनी मोर्चा काढून राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
तुळजापूर येथे सकाळच्या सुमारास छत्रपती शिवाजी चौकात महिला व मराठा समाज बांधव एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . यानंतर संभाळाच्या आवाजात विविध घोषणाबाजीत मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, दीपक चौक, भवानी रोड मार्गे मंदिर परिसरात महाद्वार येथे आला. या ठिकाणी सर्वांनी तुळजाभवानीची महाआरती केली. महाआरती नंतर मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महाआरतीनंतर मोर्चा महाद्वार रोडने कमान वेस, मंगळवार पेठ मार्गे तहसील कार्यालयावर धडकला. या ठिकाणी महिलांनी मागण्यांचे निवेदन दिले व मनोज जरांगे यांना पाठिंबासाठी घोषणा दिल्या. यानंतर मोर्चेकरी सर्व महिला मार्गस्थ झाले.
   या मोर्चात तुळजापूर विधीज्ञ असोशिएन, लिंगायत समाज, धनगर समाज यासह इतर मागासवर्गीय समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी या मोर्चात सहभाग नोंदवून आपला पाठिंबा जाहीर केला.
      या मोर्चात प्रथमच सत्तारूढ पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सामील झाले. यामुळे मराठा सकल समाजातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे व याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत होती.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !