बोगस डॉक्टर शोधन जिल्हास्तरीय समितीची बैठक पडली पार

बोगस डॉक्टर शोधन जिल्हास्तरीय समितीची बैठक पडली पार 


धाराशिव दि.६ (प्रतिनिधी) - आरोग्य विभागांतर्गत बोगस डॉक्टर शोधन जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या उपस्थितीत दि.६ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. 

 या बैठकीमध्ये जिल्ह्यातील अनाधिकृत वैद्यकीय व्यवसायिकांचा तालुकानिहाय गोषवारा सादर करण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंतच्या सर्वेक्षणामध्ये ९० व्यवसायिकांची नोंद झाली आहे. त्यापैकी तालुका अंतर्गत विविध पोलिस ठाण्यामध्ये २६ व्यवसायिकांवर अनाधिकृत वैद्यकीय पोलिस तपास सुरु आहे. तर १५ प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. तसेच ४२ व्यावसायिकांना यादीतून काढून टाकण्यात आले असून यामध्ये व्यवसाय बंद केलेले, फरार व मयत आदींचा समावेश आहे. तालुकास्तरीय ग्रामीण व शहरी पथकांनी प्राप्त तक्रारी व माहितीनुसार गुन्हे दाखल न झालेल्या उर्वरित सर्व व्यवसायिकांवर गुन्हे दाखल करावेत. तर व्यवसाय बंद केलेले व्यवसायिकांनी पुन्हा व्यवसाय चालू केले किंवा नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. जर त्यांनी नंतर व्यवसाय चालू केला असेल तर त्यांच्यावर पुन्हा कारवाई करण्यात यावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. जिल्ह्यात अनेक बोगस वैद्यकीय व्यवसायिक व्यवसाय करीत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश हरिदास यांनी केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरिदास, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. इस्माईल मुल्ला, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा सह संचालक कुष्ठरोग डॉ.मारुती कोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. फुलारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रेणुका राठोड यांच्यासह सर्व वैद्यकीय अधीक्षक व सर्व तालुका आरोग्य अधिकारी तालुका सर्व जिल्हास्तरीय सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 


.....................



 अनाधिकृत वैद्यकीय व्यवसायिकांवर प्रतिबंधात्मक कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी ग्रामीण स्तरावर तालुका आरोग्य अधिकारी, गट विकास अधिकारी प्रतिनीधी (संबंधित तालुका), सहाय्यक पोलिस निरिक्षक, पोलिस उपनिरिक्षक (स्थानिक पोलिस स्टेशन संबंधित तालुका कार्यक्षेत्र) तर शहरी भागात अतिरिक्त शल्य चिकित्सक हे धाराशिव शहरासाठी व इतर सर्व तालुक्यांसाठी वैद्यकीय अधीक्षक, मुख्याधिकारी नगर परिषद ( संबंधित तालुका), सहाय्यक पोलिस निरिक्षक, पोलिस उपनिरिक्षक (स्थानिक पोलिस स्टेशन संबंधित तालुका कार्यक्षेत्र) तसेच तालुका स्तरीय गठीत पथकास २०२२-२३ या वर्षात अनाधिकृत वैद्यकीय व्यवसायिकांवर कारवाईसाठी मान्यता देण्यात आली. तालुकास्तरावर पथकाने कार्यवाही करताना संबंधित व्यवसायिकाची माहिती घेण्यात यावी असे सांगितले. 



Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !