आंदोलकांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आमदारांच्या यांच्या प्रतिमेचा जाळल्या सकल मराठा समाजाचे आंदोलक आक्रमक
आंदोलकांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आमदारांच्या यांच्या प्रतिमेचा जाळल्या
सकल मराठा समाजाचे आंदोलक आक्रमक
धाराशिव दि.१ (प्रतिनिधी) - मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. तर सरकारने सातत्याने हे आरक्षण देण्यासाठी मुदत वाढ हे धोरण अवलंबले आहे. तसेच आज दिनांक एक नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये या आरक्षणासाठी पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी समर्थन देणाऱ्या आमदार कैलास पाटील यांच्यासह इतर आमदारांना अटक केली आहे. त्यामुळे या सरकारच्या कृतीचा मराठा आंदोलकांनी जाहीर निषेध केला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या प्रतिमांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थेट आग लावून जाळून या सरकारचा व सर्वपक्षीय बैठकीतील नेते मंडळींसह सर्व आमदारांचा जाहीर निषेध केला.
संकेत सुर्यवंशी, अभिजीत देशमुख, धर्मा सुर्यवंशी, निलेश साळुंके, धैर्यशील सस्ते, बंडू आदरकर, अक्षय नाईकवाडी, अमोल जाधव, अण्णा यादव, वैभवी आकाश मुगळे, पंकज पाटील, अमोल शिरसाट आदींसह इतर मराठा बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.