प्राचार्य डॉ गवई यांच्या हस्ते चला शिकूया ग्रंथाचे प्रकाशन
- Get link
- X
- Other Apps
मुरुम दि.४ (प्रतिनिधी) - लातूरचे रहिवाशी तथा चलबुर्गा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तंत्रस्नेही सहशिक्षक अंगद पवळे लिखित चला शिकूया या ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय गांधी यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडले.
या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, प्रा. डॉ. सतिश शेळके, प्रा. डॉ. महेश मोटे, प्रा. सुप्रिया बिराजदार, प्रा. शिवशरण हावळे, प्रा. देवदत्त मुंढे आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. गवई यांनी म्हणाले की, पवळे यांनी प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठीचा एक उत्तम प्रयोग साहित्यातून उपलब्ध करून दिला आहे. त्याबद्दल विशेष कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. तर डॉ. गायकवाड म्हणाले की पवळे हे एक उपक्रमशील शिक्षक असल्याचा सार्थ अभिमान आम्हाला वाटतो. विशेष म्हणजे त्यांचा हा प्रयत्न निश्चितच दिशादर्शक ठरेल असे त्यांनी सांगितले. तसेच उपप्राचार्य डॉ. लखादिवे म्हणाले की, लातूरच्या संत शिरोमणी सावता महाराज प्रकाशनाकडून १ ते ६ भागात मूळ अक्षरांची ओळख, दर्जेदार कौशल्य वापरून मांडणी करण्यात आली आहे. पवळे यांनी पुस्तकाच्या प्रकाशनाबाबतची भूमिका, स्वरूप व त्यातील महत्त्वपूर्ण तंत्र-कौशल्य विस्ताराने मांडली असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. डॉ. महेश मोटे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. देवदत्त मुंढे यांनी व आभार जयश्री पवळे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps