आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना संवेदन कृषी किटचे वाटप

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना संवेदन कृषी किटचे वाटप

धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) - १ जानेवारी ते सप्टेंबर २०२३ या कालावधीतील कर्ज, नापिकी, नैराश्य व अशा विविध कारणांमुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांना कृषी मंत्र्यांच्या संकल्पनेतून तथा माणूसकीच्या भावनेतून संवेदन अंतर्गत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ व सहयोगी संस्थामार्फत मदतीचा हात देण्यासाठी शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य व कृषी मालावर प्रक्रिया केलेली अन्न उत्पादने वाटप करण्याचे नियोजित केले आहे. कृषी किटमध्ये निविष्ठा, खाद्यपदार्थ व रंगीत बॅग आदींचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील ७६ शेतकरी कुटुंबांना (धाराशिव - २०, तुळजापुर -१२, उमरगा-४, लोहारा-३, भुम-३, परंडा-८, कळंब-२१ व वाशी ५ ) महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ व सहयोगी संस्था यांच्यामार्फत प्राप्त कृषी किट प्रकल्प संचालक आत्मा यंत्रणेमार्फत वाटप करण्यात येणार आहे.   
               जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, आत्मा प्रकल्प संचालक रविंद्र माने, विभागीय व्यवस्थापक (एमएआयडीसी) एम.बी. व्हटकर, सहाय्यक व्यवस्थापक (पणन) जे.जे. ठाकूर, तालुका कृषी अधिकारी एस.पी. जाधव यांच्या उपस्थितीत धाराशिव तालुक्यातील ७ शेतकरी कुटुंबांना प्रातिनिधीक स्वरुपात संवेदन कृषी किटचे वाटप करण्यात आले. कृषी किटमध्ये परसबाग भाजीपाला बियाणे - ४४५ ग्रॅम, नॅनो युरीया - ५०० मिली, सुक्ष्म मुलद्रव्ये ग्रेड २ - ५०० मिली, मायकोरायझा - ५०० मिली, बोरॉन २० टक्के - ५०० ग्रॅम कृषी निविष्ठा तसेच नोगा हॅम्पर,  कोको हाय प्रिमियम ड्रिंक्स - २५० मिली, चकली मसाला+चिवडा मसाला+शेंगदाणा चिक्की - ५० ग्रॅम+५० ग्रॅम आदी खाद्यपदार्थांचा समावेश कृषी किटमध्ये करण्यात आला आहे.

                      

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !