घराचे कुलूप तोडून चोरी करणारा चोरटा मुद्देमालासह जेरबंद

घराचे कुलूप तोडून चोरी करणारा चोरटा मुद्देमालासह जेरबंद
धाराशिव दि.४ (प्रतिनिधी) - रात्रीच्या वेळी घरी कोणी नसल्याच्या संधीचा गैरफायदा घेत एका सराईत चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील दोन मोबाईल व रोग पाचशे रुपये असा एकूण २१ हजार रुपये पाचशे रुपयांचा माल चोरुन धूम ठोकली होती. मात्र मुरूम पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधित आरोपीस ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करून त्याला जर बंद केले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उमरगा तालुक्यातील आंबेडकर नगर मुतखन्ना गल्लीतील सुहास महादेव शेळके (वय ५१ वर्षे) यांच्या राहत्या घराचे कुलूप बेळंब ह.मु. नाईकनगर येथील संशयीत आरोपी नागेश अण्णाप्पा चारे यांनी दि.३ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० ते पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास तोडून आत प्रवेश करुन घरातील विवो कंपनीचा १ मोबाईल, ओप्पो  कंपनीचे २ मोबाईल व रोख रक्कम ५०० असा एकूण २१ हजार ५०० रुपये किंमतीचा माल चोरुन नेला. या प्रकरणी सुहास शेळके यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुरुम पोलीस ठाण्यात कलम ४५७, ३८० भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान मुरुम पोलीस ठाण्याच्या पथकाने सुहास शेळके यांनी पोलीस ठाणे मुरुम येथे दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी लागलीच संशयीत आरोपी नागेश अण्णाप्पा चारे यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे त्या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने तो गुन्हा केल्याची कबुली दिली. यावर मुरुम पोलीसांनी त्या आरोपीसह चोरीस गेलेला माल हस्तगत केला असून गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सुरु आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !