नळदुर्ग - राष्ट्रीय महामार्गावरील मुर्टा पाटी येथे रास्ता रोको आंदोलन
नळदुर्ग - राष्ट्रीय महामार्गावरील मुर्टा पाटी येथे रास्ता रोको आंदोलन
नळदुर्ग दि.१ (प्रतिनिधी) - मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ व मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून टिकणारे ५० टक्क्याच्या आतील आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी सोलापूर - हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्र.६५ वरील मुर्टा पाटी येथे परिसरातील मुर्टा, चिकुंद्रा, होर्टी, जळकोट गावातील मराठा समाज बांधवाच्यावतीने दि.३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार एम.डी. पांचाळ व नळदुर्ग महसुल मंडळाचे मंडळ अधिकारी जयंत गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी गोपाळ सुरवसे, अतुल भोसले, आत्माराम साळुंके, अमित कदम, वामन कदम, होर्टी येथील ज्ञानेश्वर भोसले. जळकोट येथील श्रीनिवास पाटील, गजेंद्र कदम, अनिरुद्ध कदम, नळदुर्ग येथील कमलाकर चव्हाण, संतोष पुदाले चिकुंद्रा येथील शाहुराज गायकवाड, संतोष मोटे, विजय गरड संजय मोटे यांच्यासह परिसरातील मराठा बांधव सहभागी होते. नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक स्वप्निल लोखंडे, उपनिरिक्षक रियाज पटेल यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.