राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी दुधगावकर यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी दुधगावकर यांची नियुक्ती

धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेस (शप) च्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी विद्यमान जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका पत्राद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद रिक्त असून नूतन जिल्हाध्यक्षांची निवड होईपर्यंत दुधगावकर यांनी प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला. तसेच
आपण पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी पण सर्व शक्तीनिशी योगदान द्याल असा विश्वास वाटत आहे. तर समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय-धोरणे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील रहाल अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केली आहे. 

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !