ऊसतोड खर्च कपातीत डॉ आंबेडकर सहकारी साखर कारखान्याची राज्यात भरारी ५४९ रुपये सर्वांत कमी खर्च कपात करण्यात डॉ. आंबेडकर कारखान्यास यश
ऊसतोड खर्च कपातीत डॉ आंबेडकर सहकारी साखर कारखान्याची राज्यात भरारी
५४९ रुपये सर्वांत कमी खर्च कपात करण्यात डॉ. आंबेडकर कारखान्यास यश
धाराशिव दि.२ (प्रतिनिधी) - गाळप हंगाम २०२२-२३ मध्ये शेतकऱ्यांच्या रास्त व किफायतशीर किंमतीच्या (एफआरपी) देय रकमेतून ऊस तोडणी व वाहतुकीपोटी सर्वाधिक खर्च कपात करण्यामध्ये धाराशिव तालुक्यातील केशेगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने प्रती टनास ५४९ रुपये ८० पैसे इतकी सर्वात कमी खर्च कपात करुन राज्यामध्ये अव्वल स्थान पटकावीत भरारी घेतली आहे.
गतवर्षी उसाच्या एफआरपीचा १०.२५ टक्के उताऱ्यासाठी प्रती टनाचा दर ३ हजार ५० रुपये होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा १०.६१ टक्के व प्रती टन निव्वळ एफआरपीचा दर ३.१५९.८० आहे. त्यातून ऊस तोडणीचा खर्च प्रती टन खर्च ५४९.८० रुपये वजा करता शेतकऱ्यांना प्रती टनास २ हजार ६१० रुपये दर मिळाला आहे.
सर्वाधिक खर्च कपात करण्यामध्ये पहिले १० साखर कारखाने हे खासगी आहेत. १० व्या क्रमांकावरील नागपूरमधील मानस ॲग्रोने किमान ९९८.९६ रुपये तर नियमित ऊस गाळप हंगाम घेणारा व सर्वाधिक खर्च कपात करणारा दोन क्रमांकावरील कारखाना हा
प्रती टनास १२१८ रुपये सर्वाधिक कपात कोल्हापूरमधील रिलायबलकडून, साजन शुगर या खासगी साखर कारखान्याचा सरासरी साखर उतारा १०.०४ टक्के आणि निव्वळ एफआरपीचा दर २,९८५.८५ रुपये आहे. त्यामधून १,१४६.९२ रुपये प्रतिटन ऊसतोडणी वाहतूक खर्चकपात करता शेतकऱ्यांना १,८३८.९३ रुपये मिळाले असल्याची माहिती पुणे येथील साखर आयुक्तालयातील साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी यांनी दिली आहे. राज्यात कारखान्यांमार्फत ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणा उभारणी करऊन शेतकऱ्यांच्या वतीने त्यांच्या उसाची तोडणी व वाहतूक केली जाते. यापोटी आलेला खर्च ऊस पुरवठादार शेतकन्यांच्या एफआरपीच्या देय रकमेतून कपात करण्यात येतो. गतवर्षी करण्यात आलेल्या ऊस तोडणी व वाहतूकपोटीच्या पध्दतीनुसार खर्च कपातीच्या शेतकऱ्यांना माहिती हेण्यासाठी साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी परिपत्रकाद्वारे सहकारी व खासगी कारखानानिहाय कपातीची रक्कम घोषित केली आहे. विविध शेतकरी संघटनांकडून हा खर्च जास्त कापला जात असल्याचा आक्षेप व्यक्त केला जातो.
.........................................
सर्वात कमी सरासरी ऊसतोडणी व वाहतूक खर्च कपात करणारे पहिले ५ कारखाने (प्रति मे.टनास)
राज्यात मागील वर्षीच्या हंगामात ऊसतोड आणि वाहतूक खर्चकपात करणार्या राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांमध्ये धाराशिव जिल्ह्यातील २ कारखान्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त कोल्हापूर जिल्ह्यातील रिलायबल शुगर अॅन्ड डिस्टलरी पॉवर लिमिटेड यांनी शेतकर्यांच्या देय रकमेतून वाहतूक आणि तोडणी खर्चापोटी १ हजार २१८ रूपये अहमदनगर जिल्ह्यातील साजन शुगर प्रा. लि. ने १ हजार १४६ रूपये, भंडारा येथील मानस ऍग्रो इंडस्ट्रीजने एक हजार ८२ रूपये, नाशिक जिल्ह्यातील धाराशिव शुगर लिमिटेडने १ हजार ६१ रूपये तर छत्रपती संभाजीनगर येथील घृष्णेश्वर शुगर प्रा. लि. या कारखान्याने १ हजार ५५ रूपये प्रती मेट्रीक टन शेतकर्यांच्या एफआरपीमधून खर्च कपात केली आहे.
................................
सर्वात कमी ऊस तोडणी व वाहतूक खर्च कपात करणारे कारखाने
धाराशिव तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना प्रती टन ५४९.८० खर्च कपात, अहदमनगर जिल्ह्यातील सहकारमहर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी सा. का. प्रती टन ६२१.२५ खर्च कपात, कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती सहकारी साखर कारखाना प्रतिटन ६२६.५२ रुपये खर्च कपात, कळंब तालुक्यातील नॅचरल शुगर ऍण्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रती टन ६३९.२२ रुपये खर्च कपात, सांगली जिल्ह्यातील पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथआण्णा नाईकवाडी हुतात्मा किसन आहिर सहकारी साखर कारखाना प्रतिटन ६५६.२८ रुपये खर्च कपात केली आहे.
...........................
साखर उतारा अन् एफआरपीमध्ये प्रगती
मागील वर्षी १०.२५ टक्के उतार्यासाठी प्रतिटन तीन हजार ५० रूपये एफआरपी निर्धारित करण्यात आला होता. साजन शुगर या खासगी साखर कारखान्याचा सरासरी उतारा १०.०४ टक्के आणि एफआरपी दर २ हजार ९८५.८५ रूपये आहे. त्यामध्ये प्रती टन १ हजार १४६.९२ रुपये ऊसतोड व वाहतूक खर्च कपात करून शेतकर्यांना १ हजार ८३८.९३ रूपये मिळाले आहेत. तर धाराशिव तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा १०.६१ टक्के आणि प्रती टन एफआरपी दर ३ हजार १५९.८० आहे. त्यातून ऊस तोडणी आणि वाहतूक खर्चापोटी प्रती टन केवळ ५४९.८० रूपये वजा करून शेतकर्यांना प्रतिटनास दोन हजार ६१० रूपये दर दिला असल्याची माहिती पुणे येथील साखर आयुक्तालयातील साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी यांनी दिली.