राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेत खरमाटेची सुवर्णपदकाची कमाई

राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेत खरमाटेची सुवर्णपदकाची कमाई

धाराशिव दि. (प्रतिनिधी) - राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेत पैलवान पौर्णिमा खरमाटेने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे दि.३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत नळदुर्ग येथील कला सायन्स व वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थीनी खरमाटे हिने लातूर विभागाचे नेतृत्व करत १८ वर्षाखालील ६५ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली.  तसेच कुस्ती क्षेत्रामध्ये पौर्णिमेला राज्यस्तरीय स्पर्धेत २ ब्रांझ, ३ सिल्वर व ३ गोल्ड मेडल व जुडो क्रीडा प्रकारात १ गोल्ड, १ सिल्वर पदक मिळालेली आहेत. ती क्रीडा महर्षी शिवाजीराव नलावडे कुस्ती संकुल धाराशिव व सह्याद्री इंटरनॅशनल कुस्ती संकुल पुणे येथे सराव करीत आहे. याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !