रात्रीच्या वेळी पिकपला रिक्षा व मोटारसायकल आडवी लावून लुटले
- Get link
- X
- Other Apps
धाराशिव दि.४ (प्रतिनिधी) - अहमदनगरखडे जाणाऱ्या पिकपला चौघाजणांनी रिक्षा व मोटारसायकल आडवी लावून रोख रकमेसह मोबाईल चोरी करून पसार झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील अशोक नगर येथील स्वप्नील रावसाहेब कनगरे (वय २२ वर्षे), याच्या सोबत भाऊ हे दोघे धाराशिव तालुक्यातील केशेगाव येथून पिकअप क्र एमएच- १७ बीवाय- ५१९६ ने श्रीरामपुरकडे जात असताना धाराशिव शहरातील अमर पॅलेस येथील सर्व्हीस रोडने उड्डान पुलाकडे जात असलेल्या रोडवर अनोळखी ३ ते ४ लोकांनी पिकअपला रिक्षा व मोटारसायकल आडवी लावून मारहाण करुन रोख १० हजार रुपये व रेडमी कंपनीचा मोबाईल असा एकूण १४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जबरीने लुटून पसार झाले. या प्रकरणी स्वप्नील कनगरे यांनी दि.३ नोव्हेंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात कलम ३७८ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
- Get link
- X
- Other Apps