महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबाबत बैठक पडली पार

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबाबत बैठक पडली पार 

धाराशिव दि.७ (प्रतिनिधी) - शहरातील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ प्रशासकिय भवनात महाराष्ट्र राज्य शासन प्रमाणित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२३ ची नियोजन बैठक आयोजक आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिवचे अध्यक्ष आयोजक  सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, संयोजक तथा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अभिराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि. १६ ते २० नोव्हेंबर रोजी श्री तुळजाभवानी क्रिडा संकुल येथे होणार आहे.
 महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा बहुमान प्रथम आपल्या जिल्हास मिळाला असून तमाम जिल्ह्या वासी नागरिकांनी आनंद घ्यावा असे मनोगत व्यक्त करुन आयोजक संस्था असल्याने संस्थेतील सर्व विभागातील प्राचार्य, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांना कामाचे वाटप करुन एकजूटीने महाराष्ट्र केसरी स्पर्धा यशस्वी करण्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी श्रीपतराव भोसले हायस्कूलचे प्राचार्य साहेबराव देशमुख, उपप्राचार्य संतोष घार्गे, नंदकुमार न्ननवरे,  संस्था सदस्य संतोष कुलकर्णी, नुतन विद्यामंदीरचे मुख्याध्यापक प्रदीपकुमार गोरे, प्राचार्य अमोल जोशी, देशमाने, उल्हास सुरवसे, डॉ.वाले, जगताप, पसारे, स्वप्निल पाटील, संदीप जगताप, के.टी. पाटील, शेषनाथ वाघ , तुकाराम शेटे, कुमार निकम, प्रमोद कदम, मनोज डोलारे, विवेक कापसे, लिपीक त्रइषीकेश शिंदे आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !