ईटकूर येथील एका शेतकऱ्याच्या मका पिकामध्ये सापडला अर्धा टन गांजा ६० लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

ईटकूर येथील एका शेतकऱ्याच्या मका पिकामध्ये सापडला अर्धा टन गांजा

६० लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

धाराशिव दि.६ (प्रतिनिधी) - मकेच्या पिकामध्ये ४ गुंठे गांजाची लागवड करून त्याचे संवर्धन करणार्‍या एका शेतकर्‍यास अटक केली आहे. ओलसर असलेल्या अर्धा टन गांजाची किंमत ६० लाख ६ हजार आहे. असून त्या

शेतकऱ्याविरूध्द कळंब उपविभागीय पोलीस अधिकारी एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने कारवाई केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.६ नोव्हेंबर रोजी दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत,  कळंब पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुरेश साबळे, सपोनि हनुमंत कांबळे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाले की, प्रपोनि साबळे
यांना गोपनीय माहिती मिळाली की, ईटकूर येथे एका व्यक्तीने त्याच्या शेतात स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी विना परवाना बेकायदेशीररित्या गांजांच्या झाडांची लागवड केली असून तो त्याचे संवर्धन व जोपासना करीत आहे. या माहितीवरून अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत व उपविभागीय पोलीस अधिकारी एम. रमेश यांना छाप्याबाबत माहिती देवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. या कारवाईबाबत तहसील व कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना माहिती देण्यात आली.  संबंधित अधिकार्‍यांना घेवून विशेष पोलीस पथक इटकूर शिवारात शेत जमीन गट नं. १२०१ मध्ये शेतकरी दशरथ संपती काळे याने मकाच्या शेतात अवैध गांजांची झाडे लावून त्याचे संवर्धन करीत असताना मिळून आला. त्याच्या शेतातून ६० लाख ६ हजार रुपये किंमतीची एकूण ५०० किलो ५०० ग्रॅम वजनाची ओलसर गांजांची झाडे मुदेमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दशरथ काळे या शेतकर्‍याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिसांच्या विशेष पथकातील पोलीस निरीक्षक सुरेश साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, हनुमंत कांबळे, हवालदार सुनील कोळेकर, बाळासाहेब तांबडे, चालक पांडूरंग माने, दत्तात्रय शिंदे, अजिज शेख, शिवाजी राऊत, सविता कांबळे, भरत गायकवाड, करीम शेख, वैजीनाथ मोहिते, फुलचंद मुंढे, रणजित लांडगे, रोहिणी चव्हाण, चालक परमेश्वर मंगनाळे यांनी केली असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !