साडी, चोळी देवून आंदोलकांनी आरक्षणास वेळकाढूपणा करणार्‍या शासनाचा केला निषेध

साडी, चोळी देवून आंदोलकांनी आरक्षणास वेळकाढूपणा करणार्‍या शासनाचा केला निषेध

धाराशिव दि.१ (प्रतिनिधी) - तालुक्यातील वडगाव येथील आंदोलनकर्त्यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी वेळकाढूपणा काढणाऱ्या सरकारचा साडी, चोळी व बांगड्या पाठवून दि.१ नोव्हेंबर रोजी निषेध केला. दरम्यान, दि.३१ ऑक्टोबर रोजी रात्री गावातून कॅन्डल रॅली काढण्यात आली.

मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे यांचे आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ साखळी उपोषण सुरु आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, सरसकट मराठा बांधवाना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी जरांगे हे आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व सरकारच्या वेळकाढूचा निषेध करण्यासाठी आंदोलकांनी हे आंदोलन केले. 

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !