नॅचरल शुगरच्या सभासदांना साखर व शुद्ध गाय तुप सवलतीच्या दरात वाटप सुरु - ठोंबरे
रांजणी दि.४ (प्रतिनिधी) - कळंब तालुक्यातील रांजणी येथील नॅचरल शुगर ऍण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि. या कारखान्याच्या सभासदांना दिवाळी सण आपल्या कुटूंबा समवेत आनंदाने व हर्षोल्हासाने साजरा करण्यासाठी नॅचर शुगरची साखर २५ रुपये प्रती किलो प्रमाणे प्रती शेअर १० किलो साखर व आपले नॅचरल डेअरीचे शुद्ध गाय तूप प्रती किलो ४५० रुपये प्रती किलो प्रमाणे सवलतीचे दरात उपलब्ध करून दिले आहे. साखर व तुप शेती गटावर दि.४ ते ११ नोव्हेेंबरपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाटप करण्याचे काम चालू करण्यात येत असल्याची माहिती नॅचरल शुगरचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी.बी. ठोंबरे यांनी दिली आहे.
नॅचरल शुगरचे प्रत्यक्ष ऊस गळीत दि.१ नोव्हेबरपासून सुरू झाले आहे. तथ यावर्षी कारखाना दैनंदीन ८ हजार मेट्रिक टन प्रमाणे ऊस गाळप करणार असून कारखान्याकडे नोंदवलेला सर्व ऊस वेळेच्या आत गाळप होणार आहे. या हंगामात नॅचरल शुगरने कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त गाळप करण्याच्या दृष्टीने १२ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे नॅचरल शुगरकडे नोंदवलेल्या सभासद व बिगर सभासदांनी आपला उत्पादीत संपूर्ण ऊस कारखान्यास गाळपासाठी देवून सहकार्य करावे व दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी आपल्या कारखान्याचा महाराष्ट्रामध्ये नावलौकीक करावा, असे आवाहन ठोंबरे यांनी केले आहे.