आंदोलन काळातही पोलिसांनी दिली भाविकांना सुरक्षा पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांचे नियोजन आले कामी

आंदोलन काळातही पोलिसांनी दिली भाविकांना सुरक्षा

पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांचे नियोजन आले कामी
धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) - कोणत्याही प्रकारच्या संकटामध्ये नागरिकांच्या मदतीला धावून जात आलेले संकट दूर करण्यासाठी पोलिसांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. शारदीय नवरात्र महोत्सव कालावधीत लाखो भाविकांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. एकीकडे या दरम्यान मराठा आरक्षणाचा लढा तीव्र पेटला होता. तर दुसरीकडे भाविकांची सुरक्षा, त्यांना संरक्षण देण्याबरोबरच सुखरूप पोहोचविणे अत्यावश्यक होते. ती जबाबदारी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अतिशय चोखपणे बजावली आहे.

 तुळजापूर हे साडे तीन शक्तीपीठांपैकी एक पुर्णपीठ असून दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील शारदीय नवरात्र उत्सव दि.१३ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत पार पडला. जिल्हा पोलीस अधिक्षक कुलकर्णी व अपर पोलीस अधिक्षक कॉंवत यांच्या मार्गदशर्नाखाली या नवरात्र उत्सवासाठी ७५ पोलीस अधिकारी, ९०० पोलीस अंमलदार, ९१९ गृह रक्षक दलाचे जवान यांचा तगडा बंदोबस्त पुरविण्यात आला होता. यांच्या माध्यमातून संपूर्ण नवरात्र उत्सवा दरम्यान भाविकांची मोठ्या संख्येने होणारी गर्दी लक्षात घेऊन योग्य प्रकारे वाहतूक नियमन व पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. यात्रा कालावधीत अंदाजे १० ते १२ लाख भाविकांनी आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. तसेच दि. २८ व २९ ऑक्टोबर रोजी साजऱ्या झालेल्या कोजागिरी पोर्णिमेनिमीत्त अंदाजे ३ लाख भाविकांनी आई तुळजा भवानी देवीचे दर्शन घेतले. यात्रे दरम्यान संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यात आल्यामुळे यात्रे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तसेच या यात्रे दरम्यान राज्यातून ५०० एस.टी. महामंडळाच्या बसेस तर कर्नाटक व तेलंगना राज्यातून ४०० ते ५०० बसेस सोडण्यात आल्या होत्या. तसेच यात्रे दरम्यान मराठा आरक्षण मागणीसाठी संपूर्ण राज्यात रास्ता रोको आंदोलने चालु होती. या काळामध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यातून दर्शनासाठी आलेल्या भविकांच्या वाहनावर दगड फेक होऊ नये किंवा त्या भाविकांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये याची पुरेपुर खबरदारी जिल्हा पोलीस प्रशासनाने घेतली होती. पोलीस बंदोबस्तामध्ये बाहेरील राज्यातील भाविकांना घेवून जाणारे बसेस यांना उमरगा तालुक्यातील राज्य सीमेवर सुखरुपरित्या पोहचविण्यात आले. मात्र या आंदोलनाची कुठलीही झळ भाविकांना बसू दिली नाही. तसेच संपूर्ण नवरात्र उत्सवा दरम्यान कुलकर्णी यांच्या आदेशाने व मार्गदशानाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही चोरी, जबरी चोरी, पाकीट मारी आदी सारख्या घटनांना आळा घालण्यासाठी परिणामकारक गस्त राबविली. त्यामुळे यावर्षी चैन स्नॅचिंग, मोबाईल स्नॅचिंगची १ व मोटारसायकल व इतर चोरीच्या केवळ २ घटना घडल्या. ज्याचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत अतिशय कमी असून यावर्षी या जबरी चोरी, चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यात्रा कालावधीमध्ये एकूण ७५ रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.

...........................................

एकीकडे नवरात्र उत्सवामध्ये भाविकांची पायी व वाहनांमध्ये वाढणारी गर्दी तर दुसरीकडे आक्रमक आंदोलनामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारची झळ बसू नये. तसेच अडीअडचणींचा सामना करता येऊ नये व त्यांना आपापल्या घरी कसे सुखरूपपणे पोहोचविता येईल ? यासाठी पोलीस प्रशासनाने दुहेरी कसरत करून आपल्या दमदार कामगिरीची खरोखरच....सद्रक्षणाय खलनिग्रहणाय.... या ब्रीदवाक्याप्रमाणेच प्रत्यक्ष धमाकेदार परंतू तितकीच गुप्तता बाळगत व सुनियोजित थेट कृती करुन सिध्द करुन दाखविले आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !