उमरगा येथे ५ दिवसीय निवासी धम्म शिबिराचे आयोजन

उमरगा येथे ५ दिवसीय निवासी धम्म शिबिराचे आयोजन

उमरगा दि.४ (प्रतिनिधी) - ऐन दिवाळीच्या सणात धम्माचे लाडू खाऊन अधम्माला जाळून टाकण्यासाठी व सधम्माचा धम्मदीप प्रज्वलित करण्यासाठी त्रिरत्न  बुद्धिस्ट सेंटर धाराशिवच्यावतीने दि. ११ ते १५ नोव्हेंबरपर्यत येथील बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृहात निवासी धम्म शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नेतृत्व बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक धम्मचारी यशोभद्र (पुणे) हे करणार आहेत.
बोधिसत्व डॉ बाबासाहेबआंबेडकरांनी लिहिलेल्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या जागतिक कीर्तीच्या धम्मग्रंथातील धम्म अधम्म व सधम्म या प्रकरणावर हे शिबिर होत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्म अधिक जाणून स्वतःमध्ये धम्मजोत प्रज्वलित करण्यासाठी सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळीसह उपस्थित रहावे असे आवाहन त्रिरत्न बुद्धिष्ट सेंटरचे चेअरमन धम्मचारी रत्नपालित यांनी केले आहे. ५ दिवस चालणाऱ्या या निवासी शिबिरात पहाटे योगा, प्राणायाम, चिकुंगं, ध्यान, संपर्क सराव, व्यक्तिमत्व विकास, समूहचर्चा, पालि पूजेचे पठण आदींसह वेगवेगळ्या विषयांवर धम्म प्रवचने होणार आहेत. तर शिबीर कालावधीत मौनव्रत धारन करण्याची सुसंधी सर्वांना प्राप्त होणार असून आपला सर्वांगीण विकास साधण्यासाठी धम्म बांधवानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे संयोजक धम्मचारी प्रज्ञाजित, धम्मचारी ज्ञानपालित, धम्मचारी कल्याणदस्सी, धम्मचारी विरतकुमार, धम्मचारी धम्मभूषण, धम्मचारी विबोध यांनी केले आहे. शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रा.प्रदीप गायकवाड, तेजस्विनी गायकवाड, प्रीती मनोहर, काजल गायकवाड, बहुजन हिताय वसतिगृहाचे चेअरमन महादेव भोसले, अजिंक्य मुरूमकर, सुनीता कांबळे, चंद्रकांत कांबळे आदी प्रयत्न करीत आहेत.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !