राष्ट्रीय महामार्ग ५२ रोडवरील वाहने अडवून मारहाण करुन दरोडा घालणारी टोळी गजाआड - कुलकर्णी
राष्ट्रीय महामार्ग ५२ रोडवरील वाहने अडवून मारहाण करुन दरोडा घालणारी टोळी गजाआड - कुलकर्णी
धाराशिव दि.९ (प्रतिनिधी) - राष्ट्रीय महामार्गावर वाहने अडवून लुटणारी टोळी पोलिसांनी गजाआड केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.९ नोव्हेंबर रोजी दिली.
पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाले की, उत्तर प्रदेश येथील ड्रायव्हर नयाससोद्दीन खान हे कपूर डिझेल्स कंपनीचे कंटेनर घेऊन धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ५२ वर टिव्हीएस कंपनीच्या आपाची माॅडेल ४० गाड्या भरून म्हैसूर येथून राजस्थान येथे घेवून जात होते. दरम्यान दि.४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास वाशी तालुक्यातील इंदापूर शिवारातील बंद असलेल्या नरसिंह साखर कारखान्यासमोर एनएच ५२ सर्विस रोड लगत कंटेनर उभा करून खाने बाथरूमला जाऊन आले. गाडीत बसले असता अनोळखी ८ ते ९ व्यक्तींनी खान यांच्या खिशातील रोख रक्कम २७ हजार तसेच कंटेनरमधील टिव्हीएस कंपनीच्या आपाची माॅडेल ७ मोटारसायकल प्रती ९० हजार रुपये या प्रमाणे ६६ लाख २ हजार १९४ रुपयांचा माल जबरदस्तीने काढून घेतला. या प्रकरणी वाशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. त्यानंतर धाराशिव पोलिसांनी त्या तपासाची च्रक फिरवत २४ तासांच्या आत आरोपींना गजाआड केले असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच धाराशिव तालुक्यातील पिंपरी शिवारात बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून बीड येथील सराईत गुन्हेगार असलेल्या रोहीत चव्हाण यास अटक केली आहे. तर धाराशिव तालुक्यातील आंबेहोळ येथील शशी गायकवाड हा गुन्हेगार फरार आहे. मी दारू वेगवेगळ्या कंपनीच्या लेबल लावून चंद्रपूर वर्धा या ठिकाणी विकली जात होती. तसेच सध्या दीपावलीचा सण असल्यामुळे ऑनलाईन खरेदी मोठ्या प्रमाणात करण्याकडे ग्राहकांचा कल वाढलेला आहे. मात्र त्यांची फसवणूक होत असल्याच्या अनेक तक्रारी सायबर गुन्हे शाखेकडे दाखल होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अशा प्रकारच्या गुन्ह्यात होणारी फसवणूक टाळण्यासाठी हेल्पलाईन नंबरशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले. विशेष म्हणजे वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील फटाका उद्योग अंतर्गत सुतळी बॉम्बच्या आवाज मर्यादेला ७५ डेसीबलची परवानगी आहे. मात्र १५० डेसीबलपर्यंत सुतळी बॉम्ब बनविले जात आहेत. याबाबत विचारले असता त्यांनी ना हरकत प्रमाणपत्र (परवानगी) देण्याचे काम पोलीस विभागाचे आहे. मात्र डेसीबलची इतर विभागाकडे जबाबदारी असल्याचे सांगितले.