परंडा येथे बाजार पेठ सुरू ठेवण्यास मराठा समाजाची हमी

परंडा येथे बाजार पेठ सुरू ठेवण्यास मराठा समाजाची हमी

परंडा दि.१ (प्रतिनिधी) - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्वत्र आंदोलने सुरू आहेत. परंडा येथे देखील आंदोलन सुरू असून आजपर्यंत कुठलेही गालबोट लागलेले नाही. त्यामुळे यापुढे संविधानिक मार्गाने आंदोलन सुरू राहणार असून परंडा येथील बाजारपेठ बंद करू नये. तसेच तेथे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नसल्याचा हमी सकल मराठा समाजाच्यावतीने तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दि.१ नोव्हेंबर रोजी दिली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, परंडा शहर व तालुक्यामध्ये आजपर्यंत मराठा समाजाच्या वतीने जी आंदोलन झाली. त्याला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागलेला नाही. व्यापाऱ्यांनी वेळोवेळी व इतर समाजानेही त्यासाठी मनापासून पाठिंबा दिलेला आहे. तसेच यापुढेही प्रशासनाला व व्यापारी संघटनेला सूचना देऊनच पुढील आंदोलने जरांगे यांच्या आदेशाने संविधानिक मार्गानेच केली जातील. सणासुदीचे दिवस असल्यामुळे यापुढे परंडा मार्केट बंद राहणार नाही. मराठा समाजाच्यावतीने परंडा शहरात कुठेही गालबोट लागणार नसल्याची हमी परंडा तालुका सकल मराठा समाज बांधवांच्यावतीन दिली आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !