परंडा येथे दिव्यांग तपासणी शिबिरामध्ये ४० जणांची तपासणी

परंडा येथे दिव्यांग तपासणी शिबिरामध्ये ४० जणांची तपासणी

परंडा दि.३ (प्रतिनिधी) - तालुक्यातील अती तीव्र व गरजू आवश्यक असणाऱ्या दिव्यांगासाठी समाज कल्याण विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक व दिव्यांग उद्योग समूह यांच्यावतीने परंडा येथे दिव्यांगांची तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये ४० दिव्यांगांची तपासणी करण्यात आली.
या तपासणीसाठी जिल्हा दिव्यांग तपासणी अधिकारी डॉ. अविनाश भोरे, दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा प्रमुख तानाजी घोडके, शहराध्यक्ष गोरख देशमाने, पत्रकार प्रकाश काशीद, मुजीब काझी, दिव्यांग उत्तम शिंदे, दत्ता रणभोर, समीर ओव्हाळ, उत्तरेश्वर शिंदे, आरोग्य मित्र बालाजी नेटके, सरकारी दवाखाना कर्मचारी एक्स-रे विभाग बापू बोरकर आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !