संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासह उर्वरित मंडळांना अग्रीम देण्याची राष्ट्रवादीची मागणी

संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासह उर्वरित मंडळांना अग्रीम देण्याची राष्ट्रवादीची मागणी

धाराशिव दि.७ (प्रतिनिधी) - संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा व अग्रीम पिक विमा पासून वंचित राहिलेल्या १७ महसूल मंडळांना अग्रीम पीक विमा मंजूर करून तात्काळ देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अप) च्या शिष्टमंडळाने कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे दि.७ नोव्हेंबर रोजी मुंबई येथील विधान भवनमध्ये केली आहे.
 

 दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, जिल्ह्यातील वाशी, धाराशिव व लोहारा या तालुक्यांना दुष्काळग्रस्त जाहीर केले असून उर्वरित उमरगा, भूम, परंडा, तुळजापूर व कळंब ५ तर तालुक्यांना दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावे.
तसेच जिल्ह्यामध्ये एकूण ५७ महसूल मंडळे असून त्यापैकी ४० महसूल मंडळांना अग्रीम पीक विमा मंजूर केलेला आहे. त्यामुळे उर्वरित १७ महसूल मंडळांना अग्रीम पीक विमा मंजूर करून तात्काळ देण्यात यावा अशी मागणी केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, सामाजिक न्याय विभाग‌ सेलचे जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, भूम-परंडा-वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ आप्पा जगताप आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !