मराठा आरक्षण आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मंत्री सावंत यांची पाऊणे दोन कोटींची मदत छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते वाटप

मराठा आरक्षण आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मंत्री सावंत यांची पाऊणे दोन कोटींची मदत

छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते वाटप

धाराशिव दि.९ (प्रतिनिधी) - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या तरुणांच्या वारस कुटुंबियांना राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ शुगर परिवाराच्या माध्यमातून ३५ कुटुंबियांना पाऊणे दोन कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. या मदतीचे धनादेश छत्रपती संभाजीराजे व मंत्री सावंत यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. दरम्यान, मंत्री प्रा डॉ सावंत यांनी यापूर्वी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत, सामूहिक विवाह सोहळे, शैक्षणिक मदत केली आहे. तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती योजनेच्या माध्यमातून पाणी साठवणुकीचे स्त्रोत भूम, परंडा व वाशी तालुक्यात मोठ्या प्रमाणात निर्माण केले आहेत. त्यातूनच त्यांनी सामाजिक जबाबदारी जपलेली आहे.

यावेळी मंत्री प्रा डॉ सावंत म्हणाले की, मराठा तरुणांना आत्महत्या करू नका, टोकाचा निर्णय घेऊ नका असे आवाहन केले. दरम्यान आत्महत्या केलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना मदतीचे
धनादेश देऊन पालकत्व स्विकारताना मंत्री सावंत भावनिक झाल्यामुळे त्यांना अश्रू अनावर झाले. तर मराठा आरक्षणासाठी आत्महत्या होणे ही बाब दुःखद घटना असून मागील २ महिने आरक्षणाबाबत विविध राजकीय पक्ष आपली भूमिका मांडत असल्याचे सांगत मागील वेळी देखील मराठा आरक्षणसाठी ५८ मोर्चा शांततेच्या मार्गाने काढण्यात
आले. या दरम्यान ४२ जणांनी आत्महत्या केल्या असून आत्महत्या करणे हा योग्य मार्ग असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेणे चुकीचे आहे. त्यामुळे संसार उघड्यावर येत आहेत. विशेष म्हणजे अचानक एखादे वादळ यावे तसे आरक्षण आंदोलन सुरू झाले असे त्यांनी नमूद केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरक्षण मिळणार असून सरकार त्यासाठी आवश्यक ती पावले उचलत आहे. मात्र घरातील दिवा विझल्यावर काय होत ? त्या घराचे अस्तित्व टिकत नाही. परिवाराला खूप व भयंकर वेदना होतात. त्यामुळे कोणीही आत्महत्या करू नका असे कळकळीचे आवाहन करीत आत्महत्या केल्यास मिळणारे आरक्षण आरक्षण कोणासाठी  व त्याचा काय उपयोग ? असे सांगत भावनिक आवाहन त्यांनी केले. विशेष म्हणजे मी मराठा समाजात जन्मलो असून त्यासाठी माझे काहीतरी देणे लागत असल्यामुळे मी प्रत्येक कुटुंबाला ५ लाख मदत देऊन माझे कर्तव्य करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही, यावर कोणी बोलत नाही. तत्कालीन सरकारला ते आरक्षण का टिकवता आले नाही ? पहिले आरक्षण रद्द झाल्यानंतर वर्ष दोन वर्षे कोणीच काही बोलले नाही असा प्रश्नही त्यांनी विचारला. तर मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे व ते मिळवणार आहे. आपले रक्त हे समोरच्याच्या नरड्याचे घोट घेण्यासाठी असून आत्महत्या
करण्यासाठी नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आपल्या मागण्या न्यायिक मार्गाने मांडल्या पाहिजेत असे आवाहन करीत राजकीय मंडळी राजकीय पोळ्या प्रयत्न करत असून आपण टोकाचे पाऊल उचलू नका असे त्यांनी

सांगितले. 

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !