मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व पवार यांना बनवले गाढव
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व पवार यांना बनवले गाढव
धाराशिव दि.२ (प्रतिनिधी) - मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांना पाठींबा देण्यासाठी व आ.कैलास पाटील यांच्यासह इतर आमदारांनी आंदोलन केल्यामुळे त्यांना जबरदस्तीने अटक करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात गाढव कारभार सुरू असल्याचा आरोप करीत धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे फोटो गाढवांच्या गळ्यात बांधून त्यास जोडे मारीत दि.२ नोव्हेंबर रोजी निषेध केला.
जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी टायर जाळून रास्ता रोको, साखळी उपोषण, आमरण उपोषण, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचे राजीनामा आदी आंदोलने सुरु आहे. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम जाधव, सोमनाथ गुरव, अमोल जाधव, बंडू आदरकर, नीलेश साळुंक, अमोल सिरसट, गजेंद्र जाधव, साजीद शेख, पंकज पाटील, साबेर सय्यद, नवज्योत शिंगाडे, वैभव वीर, अजय नाईकवाडी आदींसह इतर मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेस जोडे मारुन निषेध केला.