नॅचरल शुगरच्या कर्मचाऱ्यांना विक्रमी २६ टक्के बोनस - ठोंबरे
- Get link
- X
- Other Apps
रांजणी दि.९ (प्रतिनिधी) - कळंब तालुक्यातील रांजणी येथील नॅचरल शुगरचे मागील वर्षातील मराठवाड्यामध्ये यशस्वी ऊस गाळप तसेच मराठवाडा, विदर्भ व खानदेशातील सर्वाधिक ऊस दरासह महाराष्ट्रामध्ये नॅचरल शुगरच्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक २६ टक्के दिवाळी बोनस मंजूर केल्याचे नॅचरल शुगरचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी.बी. ठोंबरे यांनी सांगितले.
मागील गाळप हंगाम अनंत अडचणींवर मात करत यशस्विरित्या पार पाडल्याबद्दलही त्यांनी कर्मचाऱ्यांचे विषेश कौतूक केले. तर मला जे काही द्यावयाचे आहे ते माझ्या ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचाऱ्यांनाच द्यायचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मागच्या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे मांजरा धरण भरल्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे व्यवस्थापनाने निर्धारीत केलेले १२ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट कमीत कमी कालावधीमध्ये व विना स्टॉपेज पूर्ण करण्याचे आव्हान कर्मचाऱ्यांनी पूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.
- Get link
- X
- Other Apps