शिवा संघटनेच्या धाराशिव तालुका कार्याध्यक्षपदी सगरे यांची निवड
धाराशिव दि.६ (प्रतिनिधी) - शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या धाराशिव तालुका कार्याध्यक्षपदी सुरज औदूंबर सगरे यांची निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय वीरशैव संघटनेचे मराठवाडा सरचिटणीस सुनील शेरखाने, धाराशिव जिल्हाध्यक्ष संजय गिराम यांच्या अध्यक्षतेखाली शिवा संघटनेच्या बैठकीत सगरे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी शिवा सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष समाधान भोरे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन लगदिवे, शहराध्यक्ष महेश उपासे आदीसह शिवा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.